Friday, February 14, 2014

पहिलं प्रेम....

पाहिलं वहील चा पहिलाच blog लिहायला इतका वेळ लागला. कारण विषय ही तसाच आहे आणि मुख्य म्हणजे मनाच्या अगदी जवळचा आणि जिव्हाळ्याचा आहे. आयुष्यातली पहिली अशी कोणती गोष्ट अधिक लक्षात राहते ती म्हणजे पाहिलं प्रेम. पाहिलं प्रेम म्हणल की प्रत्येकजणच nostalgic होतो. त्यात सध्या जे काही पहिल्या प्रेमावर pictures बनत आहेत त्याने तर हा अगदी रोजचा विषय झाला आहे असो तो वेगळा मुद्दा आहे. तर माझ पाहिलं प्रेम त्याला प्रेम म्हणाव कि नाही यात जरा confusion आहे पण प्रेम या विषया बद्दल झालेली माझी पहिली अनुभूती ती म्हणजे ही आठवण.
तर "ती" १० वी च्या माझ्या claas मध्ये होती. typical २ वेण्या, डोक्याला hair band , green school uniform , पायात सदैव canvaas shoes ज्याने ती सदैव इकडून तिकडे धावत असायची , पाठीवर भली मोठी sack आणि त्यावरून ओढून घेतलेला असा मोठ्ठा scarf. प्रथम दर्शनी वाचून, पाहून कुणालाही या मुली बद्दल काही विशेष भावना वाटणार नाहीत. आणि म्हणून च मुद्दाम माझ्या class  मधली बाकीची पोर मुद्दाम मला तिच्या वरून चिडवायची  जे मला अतिशय डोक्यात जायचं. काही दिवसांनी ते तिला ही कळाल मग जागतिक असा हिणकस असा look  मला द्यायची. ती राहायला तशी माझ्याच area मध्ये होती त्या वेळी ५-५ रुपयांच्या share  ऑटो ने जायचो पण जेव्हा पासून हे चिडवा चिडवी च तिला कळल होत ज्या ऑटो मध्ये मी असायचो सरळ ती ऑटो सोडून द्यायची आणि दुसर्या auto  ने जायची. ते मला अतिशय बर वाटायचं कारण चुकून ती एकदा जरी माझ्या रिक्षा मध्ये आले असती तरी तो तिच्या कडून green signal आहे अस वाटून माझ्या बरोबरच्या मित्रांनी माझ जीण हैराण करून सोडलं असत.
अश्या चकवा चकवी मध्ये दहावी कशी निघून गेली कळल ही नाही. आणि मग जस जशी खर्या अर्थाने शिंग फुटायला लागली तेव्हा वाटायला लागल आयला ती खरच भारी होती. तिची ती image डोक्यात एकदम fit झाली होती आणि अधून मधून त्याला आठवून मी सुखावयाचो वाटायचं कधी न कधी ती नक्की भेटेल तशीच. आणि second year Bcom  ला भेटली देखील एका youth festivel  ला. एरवी मुलींच्या शाळेत वाढलेली, त्यांच्यातच बडबडणारी, एका मुलावरून चिडवत आहे म्हणून चिडणारी , रिक्षा सोडणारी ती मुलगी पूर्ण पालटलेली. दोन वेण्यांचे लांब सडक केस खंद्या पर्यंत आले होते  uniform  ऐवजी साडी होती आणि चेहऱ्या वर  जबऱ्या  असा confidence आणि तेज होत.शे दोनशे पोरा, पोरीना control करत ती event host करत होती. मी आ वासुनच राहिलो.
तिने मला देखील ओळखल आणि अतिशय nicely interact झाली. मागची चिडवा चिडवी वगैरे सारे प्रकार घडले च नव्हते अश्या अविर्भावात. त्या youth festivel चे २ दिवस मी त्याच hangover मध्ये होतो कारण आम्ही वारवार भेटत होतो आणि ती अधिकाधिक चांगली वागत होती माझ्याशी. festivel च्या  शेवटच्या तर मस्त पाउस ही पडला.
आणि मग त्या नंतर ती कधीच भेटली नाही चुकून सुद्धा नाही. जेव्हा मला वाटलं  "येहीच हैं वोह" त्या नंतर मी अनेक ठिकाणी तिची माहिती काढायचा प्रयत्न केला  but result was ०. मग हळू हळू तिच्या बद्दलचा विचार पार मागे पडला. मग अचानक एका जुन्या मित्र कडून कळल की ती air hostess  झाली म्हणून
तेव्हा पासून मी माझ्या प्रत्येक विमान प्रवासा वेळी मला वाटत असत की कधी ना कधी कुठल्याश्या flight मध्ये ती भेटेल आणि मी तिला सांगू शकेन एस मला तू आवडली होतीस . reply  ची गरज नाही आणि आता तश्या भावना हि नाहीत पण व्यक्त होण्याचं समाधान म्हणून. पण म्हणतात ना गोडी अपूर्णतेची लावेल ओढ जीवा…. आणि ती गोडी अजूनही माझ्या जवळ तशीच आहे अजूनही…