Monday, June 16, 2014

शाळेतील पहिला दिवस...

शाळेतील पहिला दिवस….
जून महिन्याचा दुसरा सोमवार उजाडतो आणि बंद असलेल्या शाळा पुन्हा उघडतात. आज सकाळी अनेक पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पाल्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता सरळ सरळ दिसत होती. ते पाहून मला माझा कावरा बावरा झालेला चेहरा आठवला. तसा हा किस्सा माझ्या शाळेच्या अगदी पहिल्या दिवसाचा नाही पण जेव्हा मी high school मध्ये पहिल्यांदा जाणार होतो तेंव्हाचा आहे.
तर झालं काय मी ज्या primary school मध्ये होतो त्याच्याशी connected  high school ला admission न घेता दुसऱ्या शाळेत admission घेतली. त्या शाळेच्या primary division चा uniform होता blue pant आणि white shirt आणि High School चा typical white shirt आणि खाकी pant. पण कसा काय कुठ गोंधळ झाला देवाला ठाऊक आणि बाबांनी मला खाकी pant ऐवजी  blue pant च आणली. रिक्षावाले काका येईपर्यंत आम्ही या fact पासून पूर्णपणे अनभिज्ञ होतो. मी एकदम मस्त आवरून रिक्षा ची वाट पहात उभा होतो मागे आई बाबा ही उभे होते. आणि रिक्षा आल्यावर सगळ्यांनी माझ्या कडे पाहून जी हसायला सुरवात केली मला काही झेपेच ना. मग रिक्षावाले काका खाली उतरले आणि आई बाबांना काय गोंधळ झाला आहे ते सांगितले. बाबांनी तडक स्कूटर काढली मला म्हणाले ," तू रीक्षेने जा… तू शाळेत पोचायच्या आत मी तुझ्या uniform ची सोय करतो"
घोर अपराध्या प्रमाणे मान खाली घालून मी रिक्षेत बसलो. माझ्या आजू बाजूला पांढरे आणि खाकी बगळे आणि मध्ये मी निळी चड्डी वाला राजहंस अशी साधारण माझी स्थिती झाली होती. शाळा येई पर्यंत माझ्या वर असंख्य हशा आणि विडंबन गाण्यांचा पाउस पडला होता. खास करून " निली चड्डी वाले ( चाल तीरछी टोपी वाले ) हे गाण तर विशेष माझ्या डोक्यात गेल होत. मी चातका प्रमाणे शाळेची वाट पाहत होतो. बाबा वेळेवर आले नाही तर काय होणार ? सगळी शाळा मला हे गाण  गाणार कि काय? असे भीषण विचार मनात येऊ लागले.
पण शाळे पाशी पोचलो तोवर बाबा येउन पोचले होते. संकटात अडकलेल्या मुलाला superman जसा वाचवायला येतो अगदी तश्याच काहीश्या feelings त्या  क्षणी मला माझ्या बाबांसाठी वाटल्या. मी पटकन पार्किंग मध्ये जाऊन pant change केली आणि काही घडलच नाही अश्या थाटात शाळेत पाहिलं पाऊल  टाकल. हुश्श नजरेने एकदा बाबाकडे पाहिलं ते मागेच उभे होते हसत एक वेगळाच confidence आला आणि वर्गात पळालो
आता हे सगळ आठवल की वाटत अश्या गमती जमती घडायलाच हव्या त्यानेच बालपण समृद्ध होत आणि मी त्या बाबतीत lucky आहे. चला आज पाहिलं वाहील मध्ये इतकच पुन्हा भेटू पहिलं वहील मध्ये माझे नवीन असे काही पहिले वहिले अनुभव आणि आठवणी घेऊन.
आणि हा जर तुमच्या  कडे ही अश्या काही धमाल आठवणी असतील तर नक्की share करा
till then keep smiling
take care
अधीश

Friday, February 14, 2014

पहिलं प्रेम....

पाहिलं वहील चा पहिलाच blog लिहायला इतका वेळ लागला. कारण विषय ही तसाच आहे आणि मुख्य म्हणजे मनाच्या अगदी जवळचा आणि जिव्हाळ्याचा आहे. आयुष्यातली पहिली अशी कोणती गोष्ट अधिक लक्षात राहते ती म्हणजे पाहिलं प्रेम. पाहिलं प्रेम म्हणल की प्रत्येकजणच nostalgic होतो. त्यात सध्या जे काही पहिल्या प्रेमावर pictures बनत आहेत त्याने तर हा अगदी रोजचा विषय झाला आहे असो तो वेगळा मुद्दा आहे. तर माझ पाहिलं प्रेम त्याला प्रेम म्हणाव कि नाही यात जरा confusion आहे पण प्रेम या विषया बद्दल झालेली माझी पहिली अनुभूती ती म्हणजे ही आठवण.
तर "ती" १० वी च्या माझ्या claas मध्ये होती. typical २ वेण्या, डोक्याला hair band , green school uniform , पायात सदैव canvaas shoes ज्याने ती सदैव इकडून तिकडे धावत असायची , पाठीवर भली मोठी sack आणि त्यावरून ओढून घेतलेला असा मोठ्ठा scarf. प्रथम दर्शनी वाचून, पाहून कुणालाही या मुली बद्दल काही विशेष भावना वाटणार नाहीत. आणि म्हणून च मुद्दाम माझ्या class  मधली बाकीची पोर मुद्दाम मला तिच्या वरून चिडवायची  जे मला अतिशय डोक्यात जायचं. काही दिवसांनी ते तिला ही कळाल मग जागतिक असा हिणकस असा look  मला द्यायची. ती राहायला तशी माझ्याच area मध्ये होती त्या वेळी ५-५ रुपयांच्या share  ऑटो ने जायचो पण जेव्हा पासून हे चिडवा चिडवी च तिला कळल होत ज्या ऑटो मध्ये मी असायचो सरळ ती ऑटो सोडून द्यायची आणि दुसर्या auto  ने जायची. ते मला अतिशय बर वाटायचं कारण चुकून ती एकदा जरी माझ्या रिक्षा मध्ये आले असती तरी तो तिच्या कडून green signal आहे अस वाटून माझ्या बरोबरच्या मित्रांनी माझ जीण हैराण करून सोडलं असत.
अश्या चकवा चकवी मध्ये दहावी कशी निघून गेली कळल ही नाही. आणि मग जस जशी खर्या अर्थाने शिंग फुटायला लागली तेव्हा वाटायला लागल आयला ती खरच भारी होती. तिची ती image डोक्यात एकदम fit झाली होती आणि अधून मधून त्याला आठवून मी सुखावयाचो वाटायचं कधी न कधी ती नक्की भेटेल तशीच. आणि second year Bcom  ला भेटली देखील एका youth festivel  ला. एरवी मुलींच्या शाळेत वाढलेली, त्यांच्यातच बडबडणारी, एका मुलावरून चिडवत आहे म्हणून चिडणारी , रिक्षा सोडणारी ती मुलगी पूर्ण पालटलेली. दोन वेण्यांचे लांब सडक केस खंद्या पर्यंत आले होते  uniform  ऐवजी साडी होती आणि चेहऱ्या वर  जबऱ्या  असा confidence आणि तेज होत.शे दोनशे पोरा, पोरीना control करत ती event host करत होती. मी आ वासुनच राहिलो.
तिने मला देखील ओळखल आणि अतिशय nicely interact झाली. मागची चिडवा चिडवी वगैरे सारे प्रकार घडले च नव्हते अश्या अविर्भावात. त्या youth festivel चे २ दिवस मी त्याच hangover मध्ये होतो कारण आम्ही वारवार भेटत होतो आणि ती अधिकाधिक चांगली वागत होती माझ्याशी. festivel च्या  शेवटच्या तर मस्त पाउस ही पडला.
आणि मग त्या नंतर ती कधीच भेटली नाही चुकून सुद्धा नाही. जेव्हा मला वाटलं  "येहीच हैं वोह" त्या नंतर मी अनेक ठिकाणी तिची माहिती काढायचा प्रयत्न केला  but result was ०. मग हळू हळू तिच्या बद्दलचा विचार पार मागे पडला. मग अचानक एका जुन्या मित्र कडून कळल की ती air hostess  झाली म्हणून
तेव्हा पासून मी माझ्या प्रत्येक विमान प्रवासा वेळी मला वाटत असत की कधी ना कधी कुठल्याश्या flight मध्ये ती भेटेल आणि मी तिला सांगू शकेन एस मला तू आवडली होतीस . reply  ची गरज नाही आणि आता तश्या भावना हि नाहीत पण व्यक्त होण्याचं समाधान म्हणून. पण म्हणतात ना गोडी अपूर्णतेची लावेल ओढ जीवा…. आणि ती गोडी अजूनही माझ्या जवळ तशीच आहे अजूनही…