शाळेतील पहिला दिवस….
जून महिन्याचा दुसरा सोमवार उजाडतो आणि बंद असलेल्या शाळा पुन्हा उघडतात. आज सकाळी अनेक पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि पाल्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता सरळ सरळ दिसत होती. ते पाहून मला माझा कावरा बावरा झालेला चेहरा आठवला. तसा हा किस्सा माझ्या शाळेच्या अगदी पहिल्या दिवसाचा नाही पण जेव्हा मी high school मध्ये पहिल्यांदा जाणार होतो तेंव्हाचा आहे.
तर झालं काय मी ज्या primary school मध्ये होतो त्याच्याशी connected high school ला admission न घेता दुसऱ्या शाळेत admission घेतली. त्या शाळेच्या primary division चा uniform होता blue pant आणि white shirt आणि High School चा typical white shirt आणि खाकी pant. पण कसा काय कुठ गोंधळ झाला देवाला ठाऊक आणि बाबांनी मला खाकी pant ऐवजी blue pant च आणली. रिक्षावाले काका येईपर्यंत आम्ही या fact पासून पूर्णपणे अनभिज्ञ होतो. मी एकदम मस्त आवरून रिक्षा ची वाट पहात उभा होतो मागे आई बाबा ही उभे होते. आणि रिक्षा आल्यावर सगळ्यांनी माझ्या कडे पाहून जी हसायला सुरवात केली मला काही झेपेच ना. मग रिक्षावाले काका खाली उतरले आणि आई बाबांना काय गोंधळ झाला आहे ते सांगितले. बाबांनी तडक स्कूटर काढली मला म्हणाले ," तू रीक्षेने जा… तू शाळेत पोचायच्या आत मी तुझ्या uniform ची सोय करतो"
घोर अपराध्या प्रमाणे मान खाली घालून मी रिक्षेत बसलो. माझ्या आजू बाजूला पांढरे आणि खाकी बगळे आणि मध्ये मी निळी चड्डी वाला राजहंस अशी साधारण माझी स्थिती झाली होती. शाळा येई पर्यंत माझ्या वर असंख्य हशा आणि विडंबन गाण्यांचा पाउस पडला होता. खास करून " निली चड्डी वाले ( चाल तीरछी टोपी वाले ) हे गाण तर विशेष माझ्या डोक्यात गेल होत. मी चातका प्रमाणे शाळेची वाट पाहत होतो. बाबा वेळेवर आले नाही तर काय होणार ? सगळी शाळा मला हे गाण गाणार कि काय? असे भीषण विचार मनात येऊ लागले.
पण शाळे पाशी पोचलो तोवर बाबा येउन पोचले होते. संकटात अडकलेल्या मुलाला superman जसा वाचवायला येतो अगदी तश्याच काहीश्या feelings त्या क्षणी मला माझ्या बाबांसाठी वाटल्या. मी पटकन पार्किंग मध्ये जाऊन pant change केली आणि काही घडलच नाही अश्या थाटात शाळेत पाहिलं पाऊल टाकल. हुश्श नजरेने एकदा बाबाकडे पाहिलं ते मागेच उभे होते हसत एक वेगळाच confidence आला आणि वर्गात पळालो
आता हे सगळ आठवल की वाटत अश्या गमती जमती घडायलाच हव्या त्यानेच बालपण समृद्ध होत आणि मी त्या बाबतीत lucky आहे. चला आज पाहिलं वाहील मध्ये इतकच पुन्हा भेटू पहिलं वहील मध्ये माझे नवीन असे काही पहिले वहिले अनुभव आणि आठवणी घेऊन.
आणि हा जर तुमच्या कडे ही अश्या काही धमाल आठवणी असतील तर नक्की share करा
till then keep smiling
take care
अधीश

No comments:
Post a Comment